
मेष (ARIES – Thursday, December 15, 2022)
प्रणम्य शिरसा देवम हे स्तोत्र म्हणाल. प्रेमात पडताना सावध राहाल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. केलेल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल. घरात मोराचे पीस आणा. सायंकाळी धूप करा. तरुणांनी प्रेम करताना सावध राहावे. दुखावलेली मने पुन्हा जोडली जातील. मातीच्या भांड्यातले पाणी प्या.
शुभरंग : पिवळा
वृषभ (TAURUS – Thursday, December 15, 2022)
कुणावरही आंधळा विश्वास टाकू नका. बेफिकिरी अंगलट येऊ शकते. शहाण्या लोकांचा सल्ला घ्याल. महत्त्वाची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक घडी सुधारेल. लोकं तुमच्या मतांचा आदर करतील. कोणाचेही दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्या. ‘सदा सावध तो सदासुखी’, असे म्हणतात. हे लक्षात घ्या. शंकराची आराधना करा.
शुभरंग : मोरपीसी
मिथुन (GEMINI – Thursday, December 15, 2022)
काळभैरव स्तोत्र म्हणा. लोकांचे सहकार्य मिळेल. सहकारी आणि मित्रांची साथ लाभेल. नियोजन जेवढे चांगले कराल, तेवढे कामसुद्धा व्यवस्थित पार पडेल. घरी अनपेक्षित आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार हसतमुखाने करा. मन प्रसन्न करणाऱ्या गोष्टी कराल. आवडता पोषाख परिधान कराल. मोत्याच्या दागिन्यांची खरेदी कराविशी वाटेल.
शुभरंग : चिंतामणी
कर्क (CANCER – Thursday, December 15, 2022)
दत्त महाराजांचे दर्शन घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मौजमजा करताना सावधगिरी बाळगा. उधार देण्यापासून दूर राहा. जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. मारुतीच्या देवळात गूळ आणि चण्याचा प्रसाद वाटा. मनाचे संतुलन ढळू देऊ नका. प्रिय व्यक्तिला खूश ठेवण्यात यशस्वी व्हाल.
शुभरंग : निळा
सिंह (LEO – Thursday, December 15, 2022)
पांढऱ्या गाईला पोळी खाऊ घाला. कुलदेवतेची आराधना करा. घराजवळील देवीच्या देवळात जाऊन दर्शन घ्या. आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. आर्थिक उलाढाल बरी राहील. स्वत:साठी वेळ काढाल. एखादे काम पूर्ण होण्यासाठी नेटाने प्रयत्न करावे लागतील. दूरदृष्टीने वागणे तुमच्यासाठी हिताचे आहे. सौंदर्यवाढीकरिता चंदन पावडरचा वापर करा. आहारात गोड पदार्थांचा समावेश करा.
शुभरंग : लाल
कन्या (VIRGO – Thursday, December 15, 2022)
श्रीरामाचे दर्शन घ्या. मनाने आनंदी आणि सुदृढ राहा. काही लोकांच्या अनपेक्षित भेटीगाठी होण्याचा योग आहे. घराच्या खिडक्यांना पांढऱ्या रंगाचे पडदे लावा. स्वत:साठी वेळ काढा. जोडीदार आज तुमची अतिजास्त काळजी घेईल. देवांना पिवळ्या रंगाची फुले वाहा. कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. वरिष्ठांचा प्रभाव पडेल. घरातील वातावरण प्रसन्न असेल.
शुभरंग : राखाडी
तूळ (TULA- Thursday, December 15, 2022)
श्रीकृष्ण मंदिरात जा. मधुराष्टक म्हणा. प्रेयसीला मनातले सांगण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. थोडा धीटपणा दाखवा. मनापासून प्रयत्न करा यश मिळेल. अडचणींवर हसत हसत मात कराल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. दिलेले वचन पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न कराल. वडिलांचा सल्ला ऐका.
शुभरंग : खाकी
वृश्चिक ( SCORPIO – Thursday, December 15, 2022)
कार्तिकेय स्तोत्र म्हणा. चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या. नातेवाईकांकडून कौतुक होईल. सध्या ग्रहमान चांगले आहे. काही मने दुखावली असतील तर ती सांधण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराला काय हवे, नको ते पाहण्यात वेळ जाईल. पायांच्या घोट्याला काळा धागा बांधा. कुटुंबातील सदस्यांसोबत मिळून मिसळून राहा. मनातील गोष्ट समजून घेण्यासाठी जोडीदार पुरेसा वेळ देईल.
शुभरंग : निळा
धनु (SAGITTARIUS – Thursday, December 15, 2022)
पांढऱ्या वस्तूंचे दान करा. अति तेलकट आणि तिखट खाऊ नका. व्यापारात नफा मिळेल. जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. सकारात्मक विचार करा. वेळेचा सदुपयोग करा. मुलांना त्यांच्या आवडीचा खाऊ खायला द्याल. दुसऱ्यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ नका. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे.
शुभरंग : काळा
मकर ( CAPRICORN – Thursday, December 15, 2022)
मारुतीरायाचे दर्शन घ्या. भीमरुपी स्तोत्र म्हणा. साधना कराल तेवढे फायद्याचे हे लक्षात घ्या. उपासनेत सातत्य ठेवा. अळशीपणा करू नका. घरातील वस्तू जागच्या जागी ठेवाल. इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. सायंकाळी बागेत फिरायला जाल. कोणाही सोबत वाद घालू नका. जोडीदाराकडून आनंदाची बातमी कळण्याची शक्यता आहे. वेळेचा सदुपयोग कराल. तांब्याचा कडा हातात घाला.
शुभरंग : तांबडा
कुंभ (AQUARIUS – Thursday, December 15, 2022)
दत्त महाराजांचे दर्शन घ्या. मनाप्रमाणे घडेल. चालताना काळजी घ्या. जवळच्या व्यक्ती गैरफायदा घेणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. जुन्या आठवणीत रमाल. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्याल. नवीन कलेत स्वत:चे मन रमवा. मन:शांतीकरिता ध्यानधारणा कराल. आवडत्या रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : हिरवा
मीन (PISCES – Thursday, December 15, 2022)
लोक विचित्र वागतील तरी तुम्ही तुमचे ध्येय सोडू नका. दिवसाची सुरुवात उत्साहपूर्ण असेल. शिवाचे दर्शन घेऊन अभिषेक घाला. नमस्कार करून मनातील प्रार्थन म्हणा. कोणत्याही कामानिमित्त घराबाहेर पडताना ज्येष्ठ व्यक्तिंचे आशीर्वाद घ्या. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. आरोग्य चांगले राहिल. घर बदलण्याचा विचार कराल. प्रवासाच्या योजना आखाल.
शुभरंग : चॉकलेटी

























































