Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा ‘7 फेब्रुवारी’चे राशीभविष्य

मेष (ARIES – Tuesday, February 7, 2023)
आरोग्याची काळजी घ्या. जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घ्या. प्रवासात सामानाकडे लक्ष द्या. आज तुमच्या कामांना ठरलेल्या वेळेच्या आधीपासूनच सुरुवात कराल. कुटुंबियांना वेळ द्या. महत्त्वाच्या वस्तू योग्य जागी ठेवा. त्या हरवणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तिची अनपेक्षित भेट होईल.
शुभरंग : पांढरा

वृषभ (TAURUS – Tuesday, February 7, 2023)
गाईला गूळ खाऊ घाला. उत्तम विनोदबुद्धीमुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील. नवीन प्रकल्पासाठी निधीची आवश्यकता भासेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. मिळालेला रिकामा वेळ पुस्तक वाचनात घालवाल. मन प्रसन्न राहिल, असे छंद जोपासा.
शुभरंग : काळा

मिथुन (GEMINI – Tuesday, February 7 2023)
पैसे काटकसरीने वापरा. मित्रांचा पाठिंबा मिळेल. चिंता करणे सोडून द्या. जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होण्याची शक्यता आहे. तुमच्या आनंदी स्वभावामुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील. लाल रंगाचा पोषाख परिधान करा.
शुभरंग : नारिंगी

कर्क (CANCER – Tuesday, February 7, 2023)
काळे चणे, काबुली चणे, काळे वस्त्र किंवा मोहरीच्या तेलाचे दान करा. ताणतणावाकडे दुर्लक्ष करा. संसर्गजन्य आजारांपासून सावध राहा. आर्थिक स्थिती सुधारण्याकडे लक्ष द्यावे लागेल. चौरस आहार घ्या. रिकामा वेळ अनावश्यक गप्पा मारण्यात व्यर्थ घालवू नका. प्रिय व्यक्तिसोबत सायंकाळ घालवाल.
शुभरंग : केशरी

सिंह (LEO – Tuesday, February 7, 2023)
पैशाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे आयोजन कराल. एखाद्या इंटरेंस्टिंग व्यक्तिची भेट होईल. व्यावसायिक संकल्पना राबवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल.
शुभरंग : केशरी

कन्या (VIRGO – Tuesday, February 7, 2023)
चांदीच्या पेल्यातून पाणी प्या. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल. गुंतवणुकीचे नवीन पर्याय धुंडाळा. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यावसायिक संधी मिळेल. व्यस्त दिनचर्येचा अनुभव घ्याल. रिकाम्या वेळी रचनात्मक कार्य करा. आवडीचे पुस्तक एकांतात बसून वाचायला वेळ मिळेल.
शुभरंग : निळा

तूळ (TULA- Tuesday, February 7, 2023)
लक्ष्मी-नारायण मंदिरात प्रसाद द्या. घरातील लोकांसोबत बागेत फिरायला जाल. प्रेमानेच प्रेम वाढते, हे कायम लक्षात ठेवा. मुलांमुळे आजचा दिवस आनंदात जाईल. उधळपट्टी करू नका. रात्री हलका आहार घ्या. बोलताना मधुरावाणीचा वापर करा. ताणतणावापासून दूर राहा.
शुभरंग : खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Tuesday, February 7, 2023)
सूर्यनमस्कार घाला. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातही आरोग्य चांगले राहील. अतिचिंता करू नका. दु:ख बर्फाप्रमाणे वितळून जाईल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी वेळ काढाल. लोकं तुमचे अभिनंदन करतील. कोणावरही उगाच नाराज होऊ नका.
शुभरंग : राखाडी

धनु (SAGITTARIUS – Tuesday, February 7, 2023)
पोपटाला हिरवी मिरची खाऊ घाला. घरकाम करताना काळजी घ्या. घरगुती वस्तूंची हाताळणी बेफिकीरपणे करू नका. आवडीचे काम मिळेल. घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. पैसे ठेवण्याच्या जागी ताजी मोगऱ्याची फुले ठेवा.
शुभरंग : लाल

मकर ( CAPRICORN – Tuesday, February 7, 2023)
अन्नदान करा. दीर्घ आजारातून सुटका होईल. पैशाची बचत करा. इतरांना दुखवू नका. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वत:ला गुंतवा. कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराल.
शुभरंग : सोनेरी

कुंभ (AQUARIUS – Tuesday, February 7, 2023)
पांढरे कपडे परिधान करा. बोलण्यापूर्वी दोन वेळा विचार करा. संपूर्ण कुटुंबाला आनंद देणारी घटना घडेल. आजचा दिवस उत्साहात जाईल. उद्योग-व्यवसायानिमित्त दीर्घकाळ प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. सायंकाळी मित्रासोबत एखाद्या पार्टीचे आयोजन कराल. आराध्य देवतेचे दर्शन घ्या.
शुभरंग : चिंतामणी

मीन (PISCES – Tuesday, February 7, 2023)
खुर्चीत बसताना काळजी घ्या. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. आजचा दिवस भरपूर आनंदाचा असेल. जोडीदार तुम्हाला खूश ठेवण्यासाठी प्रयत्न करेल. स्वंयसेवी संस्थांना मदत करा. प्रिय व्यक्ती उगाचच लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न करेल. घरातील वातावरण सकारात्मक ठेवाल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही अनुकूल असेल.
शुभरंग : चॉकलेटी