याला म्हणतात लोकशाही ! ना बुलेटप्रूफ गाडी, ना अंगरक्षकांची फौज, राष्ट्राध्यक्षांची खुल्या रस्त्यावर सायकलस्वारी    

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात एखादा प्रमुख नेता म्हटला की, त्याच्या अवतीभवती अंगरक्षकांचा, बाऊन्सरचा गराडा आणि दिमतीला बुलेटप्रूफ गाडी असते. मात्र युरोपमधील सायकलींचा देश असलेल्या डेन्मार्कचे पंतप्रधान रासमुसेन यांनी दौऱयावर आलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना थेट मुख्य रस्त्यावरून सायकलस्वारी घडवली. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या या सायकलस्वारीत ना बुलेटप्रूफ गाडी होती ना अंगरक्षकांची फौज, ना सर्वसामान्यांच्या गाडय़ा रोखून जबरदस्तीने पुढे निघून जाणारा गाडय़ांचा ताफा.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर गजानन नालगे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ कोपेनहेगन शहरातील मुख्य रस्त्यावरील आहे. दौऱयावेळी डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना चक्क सायकलवर शहराची सफर घडवली त्याचा हा व्हिडीओ आहे. दोन देशांचे प्रमुख अशा प्रकारे मुख्य रस्त्यावरून खुलेआम कोणत्याही दडपणाशिवाय सायकलवरून ये-जा करू शकतात. हीच खरी लोकशाही आहे, असे नालगे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.