अमिताभ–डॅनी एकत्र येणार

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि डॅनी डॅन्झोपा खूप वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. प्रसिद्ध निर्माते सूरज बडजात्या या दोघांना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘ऊंचाई’ आहे. लवकरच याचे चित्रीकरण सुरू होणार आहे.

‘ऊंचाई’ हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि डॅनी डॅन्झोपा यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा आणि सारिका हे कलाकार दिसणार आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या चार मित्रांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर आणि डॅनी डॅन्झोपा हे चार मित्रांची भूमिका साकारणार आहेत.  सूरज बडजात्या यांच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा हा थोडा वेगळा चित्रपट असल्याची चर्चा आहे. परदेशात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि दिल्लीमध्ये चित्रीकरण केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. मार्च 2022 मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा विचार असल्याची चर्चा रंगली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या