वॉर्नर जखमी; ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिला सामना खेळण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला. त्यांचा अनुभवी आणि धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली आहे. त्यामुळे सलामीच्या लढतीत त्याचे खेळणे संदिग्ध आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा सामना शनिवारी (1 जून) अफगाणिस्तानशी होणार आहे. दुखापतीमुळेच वॉर्नर सोमवारी श्रीलंकेविरुद्धच्या लढतीत खेळला नव्हता. विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत डेव्हिड कॉर्नर खेळणार की नाही याबाबत ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने अद्याप कोणतेही कक्तक्य केलेले नाही. त्याचबरोबर त्याच्या वैद्यकीय चाचणीबद्दलही काही सांगण्यात आलेले नाही.