मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, एकूण ४५१ खासदारांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात ३२५ आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजून १२६ मते पडली. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव १९९ मतांनी फेटाळण्यात आला. मतदानावेळी एकूण ८४ खासदार अनुपस्थित राहिले. दरम्यान, संसदेचे कामकाज शुक्रवारी तब्बल १२ सुरू होते. या १२ तासात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष जुंपला होता. टीडीपीने हा प्रस्ताव संसदेत मांडला तेव्हा सत्ताधारी भाजप हा प्रस्ताव बहुमताने जिंकणार हे जाहीर होते. भाजपकडे बहुमतापेक्षाही अधिक संख्याबळ होते. हे मदतान पार पाडून सरकार स्थिर असल्याचा संदेश मोदींकडून विरोधकांना गेला आहे.

  • मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला, एकूण ४५१ खासदारांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला. अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात ३२५ आणि अविश्वास प्रस्तावाच्या बाजून १२६ मते पडली.
  • मोदी हटाओ हे विरोधकांचा नारा
  • पंतप्रधान १५ मिनिटे उभे राहू शकत नाही अशी विरोधकांची टीका पण गेली ४ वर्षे आम्ही पाय रोवून उभे
  • लोकशाहीत जनताच सगळं काही असते
  • प्रस्तावाच्या बहाण्याने काँग्रेस आपल्या सहकार्‍यांची परीक्षा घेत आहे.
  • पंतप्रधानाच्या खुर्चीत बसण्यासाठी काही लोक आतूर
  • या प्रस्तावामुळे अनेकाचे खरे चेहरे समोर आले
  • आमच्याकडे संख्याबळ आहे, आम्हाला १२५ कोटी जनतेचा आशिर्वाद
  • सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन आम्ही चांगली कामगिरी केली.
  • मोदींच्या भाषणाच्या वेळी विरोधी पक्षांचा गोंधळ.
  • १५ हजार गावांत वीज पोहोचवण्याचे कार्य आधीच्या सरकारला जमले नाही.
  • आदिवासी, दलित, पिडीतांपर्यंत वीज पोहोचवण्यात आधीची सरकारे अपयशी.
  • मोदींच्या भाषणावेळी विरोधकांची जोरदार घोषणाबाजी.
  • ३२ कोटी जनधन खाती आमच्या सरकारने उघडली.
  • एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार गेल्या दोन वर्षात ५ कोटी जनता गरीबीतून बाहेर आले
  • आम्ही शेतकर्‍यांचे उत्प्पन २०२२ पर्यंत दुप्पट करणात आहोत, यावर विरोधकांचा विश्वास नाही.
  • ८० हजार कोटी हून अधिक किंमतीचे सिंचन व्यवस्था निर्माण करत आहोत.
  • त्यांच्या कार्यकाळात मोबाईल निर्मितीचे दोन कंपनी, आमच्या कार्यकाळात त्यांची संख्या १२०.
  • २ कोटी युवकांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मंजूर.
  • १० हजारहून अधिक स्टार्टअप.
  • भीम ऍप वरून एका महिन्यात ४१ हजार कोटींचे व्यवहार.
  • मेक इन इंडिया आणि जीएसटीवरही विरोधकांचा विश्वास नाही.
  • भारत सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था.
  • आम्ही काळ्या पैशाविरोधात युद्ध पुकारले आणि हे युद्ध थांबणार नाही.
  • तंत्रज्ञानाचा वापर करून ९० हजार कोटींची बचत.
  • सव्वा दोन लाख खोट्या कंपन्या कधीही बंद करू होऊ शकतात.
  • विरोधकांनी कायदा करूनही बेनामी संपत्ती असलेल्या लोकांवर कारवाई केली नाही.
  • काँग्रेसला स्वतःवर विश्वास नाही, अविश्वासच त्यांच्या कार्यशैलीचा भाग.
  • काँग्रेसचा देशाच्या मुख्य न्यायाधीशांवर विश्वास नाही, ईव्हीएम वर विश्वास नाही.
  • कुठल्याच अधिकृत संस्थेवर काँग्रेसचा विश्वास नाही.
  • भ्रष्टाचाराची कमाई बंद झाली तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली.
  • २०२४ ला तुम्ही पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणावा ही देवाचरणी प्रार्थना.
  • ज्या बद्दल माहिती नसून ती गोष्ट उलटते, त्यात व्यक्तीचे नुकसान, अशा विषयांवर चर्चा करताना गांभीर्य पाळावे.
  • डोकलामचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा चीनच्या राजदूतांची भेट तुम्हीच घेतली.
  • त्या भेटीवरही काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही.
  • ओरडून  ओरडून देशाची दिशाभूल केली गेली.
  • हा पोरखेळ कधीपर्यंत चालणार?
  • जनतेने तुम्हाला सुधारण्याची संधी दिली आहे.
  • हा करार दोन देशांचा व्यापारांचा नाही, दोन जबाबदार देशांचा असून या करारात पूर्ण पारदर्शकता.
  • देशाच्या सेनाध्यक्षाबाबत चुकीची भाषा वापरली गेली.
  • निवृत्त झालेल्या सैनिकाला वाईट वाटत असेल.
  • सर्जिक स्ट्राईकला जुमला स्ट्राईक म्हटले ते चुकीचे
  • मोदींना काहीही म्ह्टले तरी चालेल, पण सैन्याच्या विरोधात बोलणे चुकीचे.
  • सैन्याच्या विरोधात अविश्वास हे पिढीजात लक्षण
  • १९९९ साली राष्ट्रपती भवनसमोर काँग्रेसने २७२ सदस्य संख्या असल्याचा दावा केला होता.
  • आजही स्थिर जनादेशाला अस्थिर करण्याची खेळी.
  • १९७९ साली शेतकरी नेते चरण सिंग यांना पाठिंब्याचे आश्वासन दिले आणि विश्वासघात केला.
  • चंद्रशेखर यांनाही काँग्रेसने धोका दिला.
  • देवेगौडा यांना काँग्रेसने अपमान केला.
  • लोकनेत्यांचा, पक्षांना काँग्रेसने छळले आणि देशाला अस्थिर केले.
  • आपले सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसने वोट च्या ऐवजी नोट दिले.
  • पंतप्रधान माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही, हे खरं आहे, आम्ही कोण आहोत, आम्ही गरीब, मागासवर्गीय आहोत, आपण नामदार आहोत आम्ही कामदार.
  • मोरारराजी देसाई, चौधरी चरण सिंग, वल्लभ भाई पटेल, प्रणब मुखर्जी, शरद पवार यांनी नजरेस नजर दिली त्यांच्याशी काय व्यवहार काँग्रेसने केले हे जगजाहीर.
  • आपल्या परिवार सोडून इतरही इतिहास आहे.
  • युपीए सरकारच्या काळात पेट्रोल डिझेलला बाहेर ठेवण्याचा निर्णय.
  • आम्ही चौकीदार आणि भागीदार पण तुमच्या सारखे सौदागर नाही.
  • शेतकर्‍यांच्या दुःखाचे भागीदार, युवकांच्या स्वप्नाचे भागीदार.
  • आम्हाला त्याचा गर्व.
  • आम्ही नाही तर देशात अस्थिरता असणार हा काँग्रेसचा मंत्र.
  • काँग्रेसकडून अफवा पसरवली गेली, खोटे पसरवले गेले.
  • दलित, शोषित, पिडितांना घाबरवून राजकारण केले गेले.
  • आंबेडकरांची थट्टा करणारे आंबेडकारांचे गुणगाण गात आहेत.
  • हम तो डुबे सनम तुमको भी लेकर डुबे सनम.
  • सता जशी झिरपत खालच्या वर्गातील लोकांकडे गेली, लोकशाही बळकट झाली तशी काँग्रेस नामशेष होत गेली असे चिंदबरम म्हणाले होते.
  • वाजपेयींनी झारखंड, छत्तीसगड आणि उत्तराखंड राज्याची निर्मिती शांततेत केली.
  • काँग्रेसमुळे तेलंगाणा मध्ये वाद.
  • काँग्रेसने राज्यांची विभागणी चुकीच्या पद्धतीने करून प्रश्न निर्माण केले.
  • संसाधनावरचा वाद अजूनही चालू.
  • एनडीएने विश्वास दिला की आंध्र आणि तेलंगणाचा विकास होणार.
  • विशेष दर्जापेक्षा विशेष पॅकेजला जास्त महत्त्व हे तेलुगु देसमच्या नेत्याचे वक्तव्य.
  • १४ व्या वित्त आयोगासाठे केंद्र सरकार बांधील
  • टीडीपी ने आपले अपयश लपवण्यासाठी एनडीए मधून बाहेर.
  • आंध्रची जनता हे सर्व पाहत आहे.
  • केंद्र सरकार आंध्रच्या जनतेच्या कल्याणासाठी बांधील.
  • वन रॅक वन पेंशन कोणी रखडवली?
  • जीएसटी कोणी रखडवली?
  • युपीएने जीसटीत राज्यांचा विचार केला नाही.
  • मुख्यमंत्र्याच्या अनुभावर पंतप्रधानपदाचे कार्य केले.
  • शेतकर्‍यांना हमीभाव आम्ही वाढवून दिला.
  • काँग्रेसने शेतकर्‍यांना खोटी आश्वासने दिली.
  • सत्तेवर आल्यावर अर्थशास्त्रावर श्वेतपत्रिका आणण्याचा आमचाही विचार होता.
  • काँग्रेसने बँकां खाली केल्या.
  • ६० वर्षात काँग्रेसने १८ लाख कोटी कर्ज दिले, २००८ ते २०१४ या काळात  यात वाढ होऊन ती ५२ लाख कोटी इतकी झाली.
  • काँग्रेसने टेलिफोन बँकेच्या माध्यमातून ५२ लाख कोटी कर्ज दिले.
  • फोनवरून कर्ज वाटप करण्यात आले.
  • बँकांची कर्जे न फेडल्याने एनपीएत वाढ.
  • बँकांच्या सुधारणांसाठी आम्ही कामे केली.
  • एनपीपेची समस्या काँग्रेसने निर्माण केली.
  • एनडीए सरकारने ५५ टक्के कर्ज परत मिळवण्या यश मिळवले.
  • काँग्रेसचेच सरकार जर २०१४ ला आले असते तर देशावर मोठे आर्थिक संकट कोसळले असते.
  • ३२ बिलियन डॉलरचे कर्ज फेडण्यात आम्हाला यश.
  • स्किल इंडिया, खेल इंडिया सारख्या योजनातून प्रतिभेला पंख दिला.
  • मुस्लिम भगिनींसाठी काम केले.
  • बालिकांवर अत्याचार करणार्‍यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद आम्ही केली.
  • भारतमालाच्या माध्यमातून देशाला जोडत आहोत.
  • देशाचा प्रत्येक पंचायतीकडे इंटरनेट पोहोचवले.
  • पूर्वीच्या सरकारपेक्षा आमच्या सरकारच्या कामाचा वेग जास्त.
  • रोजगाराबाबात अनेक भ्रम पसरवले गेले.
  • प्रत्येक विभागाची आकडेवारी प्रत्येक महिन्याला जाहीर करण्याचा निर्णय आम्ही घेतला.
  • ईपीएफ कडे ४५ लाख रोजगाराची नोंद.
  • सप्टेंबर २०१७ ते मे २०१८ या  ९ महिन्यात ५० लाख लोकांना रोजगार मिळाला.
  • ८० हजारहून अधिक वैद्यकीय पदवी घेण्यार्‍यांची संख्या.
  • २ लाख वकीली क्षेत्रात रोजगार निर्मिती झाली असावी.
  • ११ लाख ४० हजार लोकांना वाहतूक क्षेत्रात रोजगार मिळण्याची शक्यता.
  • २०२४ ला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणण्याचे  विरोधी पक्षांना निमंत्रण :  मोदी