महिलांचा छळ करणाऱ्याला फासावर लटकवले पाहिजे – अरविंद केजरीवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप खासदार, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्यांच्याविरोधात कुस्तीपटुंचे दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महिलांचा छळ करणाऱ्याला फासावर लटकवले पाहिजे अस वक्तव्य केलं आहे.

”कुस्तीपटू ज्यांनी देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं ते गेल्या आठवडाभरापासून आंदोलन करत आहेत. त्यांचा अपमान केला गेलाय, महिलांचा छळ झाला. महिलांचा छळ करणाऱ्याला फासावर लटकवलं गेलं पाहिजे. आपल्याला आरोपीविरोधात तक्रार दाखल करुन घ्यायला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जावं लागतं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.” असे वक्तव्य अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

”अन्ना हजारे यांनी या मैदानावर आंदोलन केलं त्यानंतर राजकारणात बराच बदल झाला. हे आंदोलन देखील क्रिडा क्षेत्रात नक्कीच बदल घडवेल. जे देशावर प्रेम करतात त्यांनी सुट्टी घेऊन या आंदोलनात सहभागी व्हावं”, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.