एकटे गाडी चालवत असाल तरी मास्क बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-mask-driver

देशाची राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वेगानं होऊ लागला आहे. यादरम्यान दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आता दिल्लीत प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक आहे. बुधवारी एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.

न्या. प्रतिभा सिंह यांनी आदेश दिले आहेत की, दिल्लीत प्रत्येकाने मास्क वापरणे बंधनकारक आहे. आदेशानुसार, कुणी व्यक्ती एकटे गाडी चालवत असेल तरी देखील त्या व्यक्तीने मास्क वापरणं बंधनकारक असेल.

न्यायालयाचं म्हणणं आहे की कोणतही वाहन मग त्यामध्ये एकटा व्यक्ती असेल, ते देखील सार्वजनिक ठिकाण (पब्लिक प्लेस) आहे. यामुळे मास्क बंधनकारक आहे.