राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात फीवाढीच्या विरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या जोरदार निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी फीवाढ कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना मोठाच दिलासा मिळणार आहे.
विद्यापीठाने जारी केलेल्या पत्रकानुसार विद्यार्थ्यांना सर्व्हिस आणि युटीलिटी शुल्कात 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे, तर बीपीएल श्रेणीतील विद्यार्थ्यांना हीच सूट 75 टक्क्यांपर्यंत मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा हा दुसऱयांदा मिळालेला विजय आहे. सध्या या विद्यार्थ्यांना सर्व्हिस शुल्क आणि युटीलिटी शुल्कासाठी 2 हजार रुपये दर महिन्याला द्यावे लागतात. यात वीज आणि पाण्यासाठी 300 रुपये शुल्कही समाविष्ट आहे. मात्र आता या विद्यार्थ्यांना या शुल्कापोटी केवळ 1 हजार रुपयेच द्यावे लागणार आहेत.


























































