
दिल्लीतील गुलाबीबाग परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रविवारी सकाळी फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना एका भरधाव गाडीने चिरडले. या घटनेनंतर मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. गुलाबीबाग येथील शाळेजवळ गाडीने धडक दिल्याने तेथे उपस्थित तीन मुले जखमी झाल्याची घटना घडली. ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार फुटपाथवर चढल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्या दोन मुलांची प्रकृती चांगली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली व रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव गजेंद्र (30) असून तो प्रताप नगर येथील रहिवासी आहे. लीलावती शाळेजवळ येताच त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजेंद्राला अटक करण्यात आली आहे.
#WATCH | Delhi: A speeding car hits three children in Gulabi Bagh area this morning, two children received minor injuries while the third is critical but stable and admitted to a hospital: Delhi Police
(Note: Graphic content, CCTV visuals) pic.twitter.com/1HAc4qyqGk
— ANI (@ANI) December 18, 2022
घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीने फूटपाथवर उभ्या असलेल्या तीन मुलांना धडक दिल्याचे दिसत आहे. त्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मुलांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाबाबत दिल्लीचे डीसीपी सागर सिंह कलसी म्हणाले की, गाडी फूटपाथवर उभ्या असलेल्या मुलांना धडकली. या घटनेत 10 आणि 4 वर्षे वयोगटातील दोन मुले जखमी झाली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून तिसर्याची प्रकृती गंभीर पण स्थिर आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.




























































