
उन्हाळी सुट्टय़ांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार व उत्तरेकडे जाण्यासाठी 3 ते 4 दिवस लागतात. त्यासाठी उन्हाळी सुट्टय़ांच्या काळात मुंबई ते वाराणसीदरम्यान दुरांतो एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेससारख्या अतिरिक्त अल्ट्रा-सुपरफास्ट ट्रेन्स सोडल्या जाव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी आज केली आहे. भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सेंट्रल रेल्वेचे जनरल मॅनेजर नरेश लालवाणी यांची भेट घेतली व त्यांना मागणीचे पत्र दिले.
यावेळी मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, मुंबई काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष सतीश मनचंदा, मुंबई काँग्रेसचे डॉ. सत्येंद्र अभिराम सिंह आदी उपस्थित होते.
























































