अमेरिकेत गांधीजींच्या पुतळय़ाची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेतील मॅनहॅटन येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची अज्ञातांनी तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे येथील हिंदुस्थानी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून हिंदुस्थानी दुतावासानेही या घटनेचा तीव्र निषेध करत तत्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मॅनहॅटन शहरातील युनियन स्क्वेअरजवळील लॅण्डस्केप गार्डनमध्ये 2002 मध्ये महात्मा गंधीजींचा आठ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या वेळेस गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करत तोडफोड केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून दुतावासाने स्थानिक प्रशासन आणि स्टेट डिपार्टमेंटकडे विनंती केली आहे. पुतळ्याची तोडफोड करणाऱयाविरोधात योग्य कारवाई केली जावी, असेही स्पष्ट केले आहे.

याआधीही पुतळा काढला होता

महात्मा गांधींच्या 117 व्या जन्मदिनानिमित्त 2 ऑक्टोबर 1986 रोजी आठ फूट उंचीचा गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनकडून भेट दिलेला पुतळा युनियन स्क्वेअर येथे उभारला होता. त्यानंतर हा पुतळा 2001 मध्ये काढून टाकला होता. त्यामुळे 2002 मध्ये एका लॅण्डस्केप गार्डन परिसरात तो पुन्हा उभारण्यात आला होता.