
‘स्टार’ (फायबरयुक्त पोषक पेयाच्या माध्यमातून मधुमेह व्यवस्थापनाचे सर्वेक्षण) या हिंदुस्थानात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष अलीकडेच ‘इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल प्रॅक्टिस’मध्ये प्रदर्थीत करण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात, टाइप-2 प्रकारचा मधुमेह असलेल्या 3042 व्यक्ती आणि 152 डॉक्टर यांचा सहभाग होता. मधुमह असलेल्या व्यक्तींनी दररोज फायबरयुक्त आहार घेतल्यास त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यामध्ये मदत होऊ शकते असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.
या सर्वेक्षणात मधुमेह असलेल्या व्यक्तींना दोन गटांमध्ये विभागण्यात आले. यापैकी एका गटातील व्यक्तींनी एक विशिष्ट फायबरयुक्त सप्लीमेंट किमान तीन महिने घेतले, तर दुसऱ्या गटातील व्यक्तींनी हे सप्लीमेंट घेतले नाही. तीन महिने फायबरयुक्त सप्लीमेंट घेतलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी लक्षणीय प्रमाणात नियंत्रणात असल्याचे एचबीएवनसी चाचणीत दिसून आले. त्याचप्रमाणे त्यांच्यात, वजन कमी होण्याचे प्रमाण आणि तृप्ततेची भावना, सप्लीमेंट न घेतलेल्या व्यक्तींच्या तुलनेत अधिक होती.
फायबरचे प्रमाण अधिक असलेला आहार मधुमेहाच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतो असे जगभरातील अनेक क्लिनिकल अभ्यासांद्वारे निदर्शनास आहे. आरएसएसडीआय आणि अमेरिकन डायबेटिस असोसिएशन यांसारख्या संस्थाही मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायबरयुक्त पदार्थ अधिक प्रमाणात घेण्याची शिफारस करतात. हिंदुस्थानातील मधुमेही व्यक्तींनी दररोज 25-40 ग्रॅम फायबर आहारातून घेतले पाहिजे अशी शिफारस आरएसएसडीआयने केली आहे. मात्र, हिंदुस्थानातील विविध सामाजिक-आर्थिक गटांमधील व्यक्तींच्या दररोजच्या आहारातील फायबरचे प्रमाण15- 40 ग्रॅम एवढेच आहे.फायबरयुक्त आहार सप्लीमेंटच्या माध्यमातून ही तफावत कशी भरून काढली जाऊ शकते आणि मधुमेही व्यक्तींना रक्तातील साखरेची पातळी प्रभावीरित्या नियंत्रित ठेवण्यात कशी मदत केली जाऊ शकते हे ‘स्टार’ सर्वेक्षणाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
साउथ आशियन फेडरेशन ऑफ एण्डोक्राइन सोसायटीजचे (एसएएफईएस) अध्यक्ष आणि या सर्वेक्षणाचे प्रमुख लेखक डॉ. संजय कालरा सांगतात की, “योग्य आहार हा मधुमेह व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक आहे. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आहारातील साखरेचे व कर्बोदकांचे (कार्बोहायड्रेट्स) प्रमाण कमी करण्याची आवश्यकता तर आहेच, शिवाय त्यांनी आहारातील फायबरचे प्रमाण वाढवण्याचीही आवश्यकता आहे. फायबरयुक्त पोषक सप्लीमेंट घेतल्यास त्यांना दररोज आवश्यक असलेले फायबर मिळू शकते हेच या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.”
‘स्टार’मध्ये 152 फिजिशिअन्सचाही सहभाग होता. टाइप-2 मधील मधुमेहाच्या 50 टक्के रुग्णांना, तसेच स्थूलतेसाठी उपचार घेणाऱ्या 40 टक्के रुग्णांना आणि अतिरिक्त शारीरिक वजन असलेल्या 35 टक्के रुग्णांना फायबरयुक्त सप्लीमेंट घेण्याचा डॉक्टर सल्ला देतात, असे सर्वेक्षणात आढळले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या डॉक्टरांच्या मते, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी फायबरयुक्त आहार घेण्याचा प्रमुख लाभ म्हणजे त्यांच्यातील तृप्ततेच्या भावनेत होणारी सुधारणा होय. त्याचबरोबर त्यांची शारीरिक हालचाल वाढते, एचबीएवनसी व ग्लुकोजची पातळी कमी होते आणि रक्तातील ग्लुकोज नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांची संख्या व डोस कमी केला जाऊ शकतो. टाइप 2 मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये आहारातील फायबरची भूमिका समजून घेण्यासाठी रुग्ण व डॉक्टर्स दोघांमधील जागरूकता वाढवण्याची गरज आहे असेही फिजिशिअन्सने अधोरेखित केले.
महत्त्वाचे निष्कर्ष-
एचबीएवनसी पातळीमध्ये लक्षणीय घसरण आढळून आली आहे. 3 महिने हाय-फायबर सप्लीमेंट घेणाऱ्या गटातील व्यक्तींची एचबीएवनसी पातळी सरासरी 8.04 वरून 7032 वर आली. फायबरयुक्त सप्लीमेंट न घेणाऱ्या व्यक्तींमध्ये ही घसरण आढळून आली नाही.

























































