सीबीएसई बोर्डाचे प्रमाणपत्र मिळविणे आता झाले सोपे; चेहरा दाखवा; कागदपत्रे डाऊनलोड करा

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एजुकेशनच्या (सीबीएसई) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिका व अन्य कागदपत्रे मिळविणे सोपे झाले आहे. आधार क्रमांक तसेच मोबाइल क्रमांकाशिवाय विद्यार्थी डीजीलॉकरवरून आपली कागदपत्रे डाऊनलोड करू शकतात. सीबीएसईने फेशियल रेकग्निशन सिस्टमला सुरूवात केली असून त्याद्वारे विद्यार्थी कधीही कागदपत्रे डाऊनलोड करू शकतात.

परदेशी विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर
या सिस्टीमद्वारे विद्यार्थी डीजीलॉकरद्वारे एक्सेस करू शकतात. विद्यार्थी डिजीलॉकरचा पासवर्ड किंवा मोबाईल क्रमांक विसरल्यास या सिस्टीमची मदत होणार आहे. विशेषकरून परदेशी राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नसल्यास किंवा मोबाईल क्रमांक विसरल्यास या सिस्टीमद्वारे विद्यार्थी डिजीलॉकर ओपन करू शकतात.

  • हे एक अॅप्लीकेशन सॉफ्टवेअर असून विद्यार्थ्याच्या चेहऱ्याची ओळख पटल्यावर गुणपत्रिका व अन्य कागदपत्रे डाऊनलोड करता येतील.
  • डेटाबेसमध्ये असलेल्या डिजीटल ईमेजद्वारे विद्यार्थ्याचा चेहरा जुळल्यावर विद्यार्थी कधीही कागदपत्रे डाऊनलोड करू शकतात.
  • हे अॅप्लीकेशन ’परीक्षा मंजुषा’ आणि डिजिलॉकर digilocker.gov.in/cbse-certificate.html वर उपलब्ध आहे.
आपली प्रतिक्रिया द्या