दिवाळी सणाची तयारी जोरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या शनिवारपासून दिवाळी सुरू होईल. लोकांनी उत्साहाने दिवाळी खरेदी सुरू केली असून अनेक सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांनीही जनतेसाठी उटणे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

सुभाष डामरे मित्र मंडळ, परळ आणि शिवराज प्रतिष्ठान यांच्यावतीने संस्थापक आनंद गावकर यांच्या संकल्पनेतून संचालक सुनील कदम, जीवन कामत, रवींद्र कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्या हस्ते सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, पराग चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नाना फाटक आणि प्रभाकर मोरजकर यांनी केले होते.

शिवसेना व युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी सणानिमित्त प्रभाग क्र. 201 (208) मधील नागरिकांसाठी उटणे देण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.  याप्रसंगी  वडाळा विधानसभा  संघटक राकेश देशमुख, विधानसभा समन्वयक दत्ता घाटकर, हरदीप लाली, युवासेना सहसचिव मयुर कांबळे,  शाखाप्रमुख हमीद शेख, महिला शाखा संघटिका सरिता मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.