
सामना ऑनलाईन । मुंबई
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक मुंबईत इंदू मिल येथे उभारण्यात येत आहे. स्मारकासाठी आवश्यक असलेल्या साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून पूर्ण झाल्यानंतर येथील काम केगाने सुरू आहे. हे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
























































