डॉ.मोहितकुमार गर्ग यांनी स्विकारला रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक पदाचा पदभार

नागरीकांशी संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी कळत जातील आणि त्यादृष्टीने आम्ही कामकाज सुरु करु. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यावर नियंत्रण आणण्यावर भर देऊ. नागरीकामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापराबाबत जागृती करु. असे रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी सांगितले. रत्नागिरीचे नुतन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी आज अधिक्षक पदाचा पदभार स्विकारला.

रत्नागिरीचे यापुर्वीचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांची जळगाव जिल्ह्यात बदली झाली. त्यानंतर रत्नागिरीच्या जिल्हा पोलीस अधिक्षक पदी डॉ. मोहितकुमार गर्ग यांची नेमणूक करण्यात आली. यापुर्वी डॉ. मोहितकुमार गर्ग हे गडचिरोलीमध्ये अप्पर पोलीस अधिक्षक पदावर काम करत होते़. डॉ़. मोहितकुमार गर्ग हे स्वतः एमबीबीएस आहेत. हे 2014च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी केलेल्या कार्याचा पोलीस महासंचालकांकडून पदक देऊन गौरव करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या