
मुंबई गुन्हे शाखेने कारवाईदरम्यान जप्त केलेला तब्बल 12 कोटी किमतींचा अमली पदार्थाचा साठा तळोजा येथील भट्टीत स्वाहा केला. त्यात चरस, गांजा, एमडी, कोकेन, हेरॉईन, एमडीएमए, एक्सटॅसी गोळय़ांचा समावेश आहे.
अमली पदार्थविरोधी कक्षाने गेल्या काही दिवसांत ड्रग्जविरोधात जोरदार कारवाया केल्या. अनेक तस्करांच्या मुसक्या आवळल्या तर कोटय़वधी किमतींचा ड्रग्ज साठा जप्त केला. त्यापैकी गांजा, चरस, मेफेड्रॉन (एम.डी.), कोकेन, हेरॉईन, मेथॅक्युलॉन, एमडीएमए, एक्सटॅसी गोळ्या असे एकूण 1 हजार 18 किलो 492 ग्रॅम 306 मिलीग्रॅम, 178 गोळय़ा इतका अमली पदार्थ हा तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लि. या ठिकाणी बंदिस्तत भट्टीत जाळून नाश करण्यात आला.























































