डीएसकेंचा मुलगा शिरीष पोलिसात हजर, २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी हा सोमवारी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर ते स्वतःहून हजर झाला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता कुलकर्णी यांनी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिरीष कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी दिलेली मुदत सोमवारी संपत होती. अखेर शिरीष कुलकर्णी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले.

ठेवीदारांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल सध्या डी.एस.कुलकर्णींसह त्यांच्या परिवारातील अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कारण, आपल्या परिवारातील अनेकांच्या नावांवार डी.एस.कुलकर्णींनी आर्थिक गैरव्यवहार व्यवहार केल्याचे पुरावे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत.