फक्त चार तासांत मिळणार ‘ई-पॅनकार्ड’

21

सामना प्रतिनिधी । मुंबई

महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक असलेले पॅनकार्ड आता केवळ चार तासांत मिळणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (सीबीडीटी) चार तासांत पॅनकार्ड उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम करीत आहे. सीबीडीटीचे संचालक सुशील चंद्रा यांनी ई-पॅन योजनेविषयीची माहिती मंगळवारी दिली.

सीबीडीटी एक नव्या प्रणालीवर काम करीत असून येत्या एक वर्षात ई-पॅनकार्ड देण्यास सुरुवात होणार आहे. या ई-पॅनकार्डसाठी ‘आधार’ ओळख द्यावी लागणार आहे. एप्रिल 2017 मध्ये सीबीडीटीने ई-पॅनची सुविधा लाँच केली होती.

  • ‘ई-पॅन’ सुविधेतंर्गत अर्ज करणाऱयाला ई-मेलद्वारे पॅनकार्ड सॉफ्ट कॉपी पीडीएफ फॉर्मेटमध्ये पाठविली जाईल.
  • अर्जदार ई-मेलद्वारे आलेली पॅनकॉपी डाऊनलोड करून उपयोगात आणू शकतात.
आपली प्रतिक्रिया द्या