
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि आचारसंहिता लागू झाली. मात्र आठवडा उलटल्यानंतर देखील रेल्वेचे आरक्षित तिकीट आणि विमानांच्या बोर्डिंग पासवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो का हटवला नाही, असा सवाल निवडणूक आयोगाने संबंधित दोन्ही मंत्रालयाकडे केली आहे. तसेच तीन दिवासांत त्याचे उत्तर मागितले आहे.
EC writes to Ministry of Railways & Ministry of Civil Aviation, asking them why have the pictures of PM Modi not been removed from rail tickets & Air India boarding passes even after Model Code of Conduct has come into effect. They’ve been asked to submit a reply within 3 days. pic.twitter.com/H3kMnhJZdL
— ANI (@ANI) March 27, 2019
नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाइल अॅप प्रभावी ठरले आहे. या अॅपवर 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती या आधी देण्यात आली होती.
Lok Sabha 2019 सी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717 तक्रारी
दरम्यान, महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणांत 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 131 प्रकरणांत परवाना असलेली शस्त्र कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत. तर 46 शस्त्र परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आली.






















































