’पुष्पा’, ’आरआरआर’च्या निर्मात्यांवर ईडीचे छापे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलवायसीए प्रॉडक्शन हाऊसच्या चेन्नई कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. ईडीने प्रॉडक्शन हाऊसविरुद्ध मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल केल्यानंतर चेन्नईतील एलवायसीएच्या 8 कार्यालयांची झडती घेतली. प्रॉडक्शन हाऊसने छापे आणि आरोपांबाबत मात्र अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. एलवायसीए प्रॉडक्शनने पुष्पा, आरआरआर आणि पोन्नियन सेल्वनसारख्या बिग बजेट चित्रपटांची निर्मिती केली आहे.