इजिप्तमध्ये रेल्वेचा अपघात; 32 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इजिप्तमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात तब्बल 32 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन वेगवान धावणाऱ्या रेल्वे धडकल्याने हा अपघात झाला असून यात तब्बल रेल्वेचे तीन डब्बे रुळाखाली फेकले गेले आहेत. आतापर्यंतच्या माहितीनुसार यात 32 जणांचा मृत्यू तर 66 जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. इजिप्तमधील सोहाग प्रांतात ही घटना घडली. रेल्वेच्या धडकेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघातामागील कारणांचा तपास सुरु आहे. विशेष म्हणजे याआधी इजिप्तची राजधानी कैरोमधील रॅम्स स्टेशनवर 2 वर्षांपूर्वी असाच एक भयानक रेल्वे अपघात घडला होता. इजिप्तच्या आरोग्य मंत्रालयाने या अपघाताविषयी अधिकृत माहिती दिली असून बचावकार्य सुरू असल्याचे जाहीर केले आहे.