इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाणारा ट्रक जळून खाक

64
truck-fire

सामना प्रतिनिधी । नगर

कर्जत तालुक्यातील कोकणगाव शिवारात आज सोमवारी पहाटे साडेपाच वाजता इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. संपूर्ण ट्रक आगीत जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले आहे.

मध्य प्रदेश इंदूर येथून कर्नाटककडे इलेक्ट्रॉनिक स्पेअरपार्ट घेऊन एम एच 18, बीए 0162 या क्रमांकाचा ट्रक जात होता. मात्र, धावत्या ट्रकमध्ये अचानक कसला तरी आवाज आला म्हणून ड्रायव्हरने गाडी उभी केली. ट्रकचा टायर फुटल्याचे त्याच्या निदर्शनास आले. इतक्यात ट्रकने अचानक पेट घेतला.

गाडीमध्ये बसलेले आणखी दोघेही चटकन खाली उतरले. त्यांनी आवाज देते मदतीसाठी लोकांना बोलावले. त्यांचा आवाज ऐकून लोक धावत आले. काहींनी पाण्याच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भडकत होती आणि टायरसह सर्व गाडीला काही वेळात आगीने वेढले आणि संपूर्ण ट्रक, त्यामधील साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या