
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पनामा पेपर्स प्रकरणी आज मुंबईत एक मोठी कारवाई केली आहे. झवरेह सोली पूनावाला यांच्या तब्बल 41 कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.
फेमाच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आलेली असून मुंबईतल्या वरळी येथील सीजे हाऊस येथील तीन मालमत्तांची जप्ती करण्यात आलेली आहे. ज्यांची किंमत सुमारे 41 कोटी रुपये एवढी आहे. झवरेह पूनावाला यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरुद्ध ईडीची चौकशी सुरु आहे. त्यांचे नाव पनामा पेपर्समधील ऑफ-शोअर संस्थांबाबतच्या खुलाशांमध्ये आढळले आहेत पनामा पेपर प्रकरणात आज ईडीने ही मोठी कारवाई केली.






























































