आपचे आमदार अमानतुल्ला यांना पुन्हा ईडीचे समन्स

दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ईडी ने आपचे आमदार अमानतुल्ला खान यांना उद्या, सोमवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांना कागदपत्रांसह हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने याआधी 18 एप्रिल रोजी अमानतुल्ला यांची 13 तास चौकशी केली होती. तेव्हा त्यांना अटक झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. मात्र ईडी कार्यालयातून मध्यरात्रीनंतर ते बाहेर आले.अमानतुल्ला खान हे दिल्लीच्या ओखला विधानसभेचे आमदार आहेत. दिल्ली वक्फ बोर्डात 32 जणांची बेकायदा नियुक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, वक्फ बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदा भाडय़ाने दिल्या, निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.