इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास, हा पराक्रम करणारा ठरला जगातील पहिला संघ

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला. 2000 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंग्लंड हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतानमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलतान कसोटीत इंग्लंडची आक्रमकपणे खेळत आहे.

इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल सांगायचे झाल्यास, इंग्लंडने आतापर्यंत 1057 कसोटी, 773 वनडे आणि 170 टी-20 सामने खेळले आहेत. इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. कांगारूंनी आतापर्यंत एकूण 1995 सामने खेळले आहेत. त्याचबरोबर हिंदुस्थान 1775 सामन्यांसह या यादीत तिसऱ्या आणि पाकिस्तान 1608 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.

इंग्लंड – 2000
ऑस्ट्रेलिया – 1995
हिंदुस्थान – 1775
पाकिस्तान – 1608
वेस्ट इंडिज – 1595