ईओडब्ल्यूच्या सहआयुक्त पदाचा दर्जा वाढवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (ईओडब्ल्यू) सहआयुक्त निकेत कौशिक व संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देण्यात आली असून त्यांना आहे त्याच ठिकाणी कायम ठेवण्यात आले आहे.

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी विशेष पोलीस महानिरीक्षक पदाचा अधिकारी असतो. परंतु शासनाने आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त पद अपर पोलीस महासंचालक दर्जाचे करून तेथेच निकेत कौशिक यांना बढती देऊन कायम ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगरचे पोलीस आयुक्त पद अपर पोलीस महासंचालक दर्जाचे करून तेथेच डॉ. निखिल गुप्ता यांना बढती देऊन कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, राज्याच्या आस्थापना विभागाचे अपर महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांचीदेखील बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप नवीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही.