पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांच्या रडारवर मन्नारा चोप्रा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सगळ्यांचा आवडता ‘बिग बॉस 17’ रिअॅलिटी शो सुरु झाला असून लवकरच त्याचा नॉमिनेशन टास्क होणार आहे. मात्र यावेळीचा टास्क थोडा हटके असणार आहे. या शोमध्ये 17 स्पर्धक सहभागी झाले असून त्यांना तीन घरांमध्ये विभागण्यात  आले आहे. त्यामुळे लवकरच स्पर्धकांमध्ये नॉमिनेशन टास्क होणार आहे,  या टास्कमध्ये एक ट्विस्ट येणार आहे. प्रत्येकजण बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या सर्व स्पर्धकांपैकी दोघांना नॉमिनेट करतो.यामध्ये पहिल्याच आठवड्यात मन्नारा चोप्रा स्पर्धकांच्या रडारवर दिसत आहे.

‘बिग बॉस 17’ मध्ये प्रत्येक खोलीत राहणाऱ्या एका सदस्याला नॉमिनेट करावे लागणार. या दरम्यान दिल (खोली क्र.1) स्पर्धक प्रियांका चोप्राची बहिण मन्नारा चोप्रा हिच्यावर निशाणा साधला आहे. नील भट्ट, ईशा मालवीया, अंकीता लोखंडे, ऐश्वर्या शर्मा आणि विक्की जैन, मन्नारा चोप्रा यांच्यासोबत नॉमिनेशन केले आहे. घराबाहेर पडण्य़ासाठी सर्वांनी मन्नारा चोप्राला नॉमिनेट केले आहे.

समोर गोड बोलणारे स्पर्धक मागे कसे फसवणूक करतात हे कळल्यावर मन्नाराला ही गोष्ट खटकते आणि ती ढसाढसा रडताना दिसते. मुनावर फारुकीसोबत बिगबॉस त्यांच्या या आवडत्या स्पर्धकाला कन्फेशन रूममध्ये बोलावतील तेव्हा मन्नारा  बिग बॉससमोर पूर्णपणे तुटते. मुनव्वर मन्नाराला समजवण्याचा प्रयत्न करतील. मन्नाराचे हे अश्रू पाहून बिग बॉस त्यांच्या या आवडत्या स्पर्धकाला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी शोमध्ये नवा ट्विस्ट आणणार आहे की शोच्या पहिल्याच आठवड्यात त्याला घरातून बाहेर काढण्यासाठी नॉमिनेशन करावे लागेल? हे पाहणे मनोरंजक असणार आहे.