
सामना ऑनलाईन । आदिस अबाबा
इथिओपियाहून नैरोबीला प्रवास करणारे इथिओपिअन एअर लाईन्स विमान कोसळल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
AFP news agency: Boeing 737 from Addis to Nairobi crashes, deaths reported.
— ANI (@ANI) March 10, 2019
Reuters quoting Ethiopia state broadcaster: No survivors from crashed Ethiopian Airlines Addis Ababa – Nairobi flight that was carrying 157 people. pic.twitter.com/OGKXYBOYxT
— ANI (@ANI) March 10, 2019
इथिओपीयन एअर लाईन्सचं बोईंग 737 हे विमान इथिओपियाची राजधानी आदिस अबाबा ते केनियाची राजधानी नैरोबी असा प्रवास करत होतं. या विमानात 149 प्रवासी आणि आठ क्रू सदस्य प्रवास करत होते. रविवारी सकाळी 8.38 ला विमानाने उड्डाण केलं होतं. त्यानंतर 8.44 वाजता विमानाचा संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळाने ते कोसळलं.
विमान कोसळल्याची माहिती मिळताच इथिओपियातील सर्व यंत्रणा कामाला लागल्या. त्यांनी अपघात ठिकाणी धाव घेतली. मात्र, दुर्दैवाने या अपघातात कुणीही वाचू शकलं नाही. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांच्या शोकात सहभागी असल्याचं ट्वीट इथिओपीयाच्या पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.



























































