याड लावलं…स्मार्टफोनने याड लावलं!

सामना ऑनलाईन । मुंबई

स्मार्टफोनने भल्याभल्यांना वेड लावलंय याचा प्रत्यय नुकताच जगविख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांना आला. बागडोगरा ते कोलकत्ता या प्रवासादरम्यानचा विमानतळावरील वेटिंग लाऊंजमधील एक फोटो आशाताईंनी ट्विटरवर शेअर केलाय. या फोटोमध्ये आशा भोसले आणि अन्य चारजण आहेत, पण हे चारही जण मोबाईल फोनमध्ये इतके बिझी झालेत की त्यांना आपल्यासोबत आशाताई असल्याचाच विसर पडलेला दिसतोय. फोटो शेअर करताना आशाताईंनी छानशी कॅप्शनही लिहिली आहे… ‘माझ्यासोबत चांगली लोकं आहेत पण कुणालाच बोलण्यासाठी वेळ नाही… धन्यवाद अलेक्झांडर ग्राहम बेल… ज्याने टेलिफोनचा शोध लावला…!’