
सामना ऑनलाईन । श्रीनगर
लोकसभा निवडणुकीचा कैफ चढत आहे, तस तसे जम्मू कश्मीरचे नेते वादग्रस्त विधानं करत आहे. नुकतंच फ़ारूक अब्दुल्ला यांनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांवर संशय उपस्थित केला. आता जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी 370 कलम हटवले तर जम्मू कश्मीरचे हिंदुस्थानशी नाते तुटून जाईल असे वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे.
#WATCH Mehbooba Mufti: If you break that bridge (Art 370)…then you will have to renegotiate relationship b/w India-Jammu&Kashmir, there will be new conditions…A Muslim majority state, would it even want to stay with you?…If you scrap 370, your relation with J&K will be over pic.twitter.com/HlAMZh3KcC
— ANI (@ANI) March 30, 2019
कश्मीरच्या एका सभेत पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, “जर तुम्ही अनुच्छेद 370 चा सेतु तोडला तर तुम्हाला हिंडुस्थान आणि जम्मू कश्मीरच्या संबंधाकडे नव्या दृष्टीकोणातून पहावे लागेल. एक मुस्लिम बहुल राज्याला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा आहे का? जर तुम्ही कलम 370 हटवले तर जम्मू कश्मीर आणि हिंदुस्थानचे संबंध संपुष्टात येतील.”
पुलवामा हल्ल्यात खरंच 40 जवान शहीद झाले का? फारुक अब्दुल्ला बरळले


























































