भाजपच्या सत्ताकाळात माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश

1293
anil-deshmukh

राज्यात भाजपची सत्ता असताना 2016मध्ये सोनू महाजन या माजी सैनिकावर हल्ला करण्यात आला होता. फडणवीस सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. मात्र यासंदर्भात मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार या हल्ला प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

भाजपचे तत्कालीन आमदार व आताचे खासदार उन्मेश पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. 2016 साली हा गुन्हा घडला होता. पण तेव्हा भाजपचे सरकार असल्याने पाटील यांच्याकर एफआयआर दाखल झाला नाही. त्यानंतर 2019मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु पुढे उन्मेष पाटील यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या निवेदनांनुसार पोलिसांना उन्मेष पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करून दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या