
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात येणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांना पुढील दोन महिन्यांत फेरपरीक्षा देण्याची संधीदेखील दिली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार याआधी पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात आला होता.
























































