
गिरगावातील प्रसिद्ध टोपीवाला व्याख्यानमालेने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यंदा 25 ते 30 जानेवारी दरम्यान टोपीवाला व्याख्यानमाला रंगणार आहे.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 25 जानेवारीला माजी पेंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या ‘मुंबई – कालची, आजची, उद्याची’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. 26 जानेवारी रोजी डॉ. उदय निरगुडकर यांची ‘आजची माध्यमे – काल, आज, उद्या’ या विषयावर मुलाखत होईल. तिसरे पुष्प 27 जानेवारी रोजी डॉ. संजय कळमकर यांच्या ‘जगणे सुंदर व्हावे – आनंदाच्या वाटा’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले जाईल. 28 जानेवारीला माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे ‘हिंदुस्थानी सांस्कृतिक संपदेचे जागतिक महत्त्व’ या विषयावर तर 29 जानेवारीला रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा. डॉ. अनिरुद्द पंडित यांचे ‘प्रगती आणि प्रकृती’ या विषयावर व्याख्यान होईल. 30 जानेवारीला आदेश बांदेकर यांच्या ‘आदेश ते परदेश, मला भेटलेल्या व्यक्ती’ या विषयावरील व्याख्यानाने समारोप होईल.
ही व्याख्यानमाला दररोज रात्री 8.30 वाजता कुडाळदेशकर ब्राह्मण निवासाचे मोकळे पटांगण, मॅजेस्टिक शॉपिंग सेंटरसमोर, गिरगाव येथे होईल.

























































