नगरमध्ये जिल्हा बँकेची पिक कर्ज भरण्यास 30 जून पर्यंत मुदतवाढ

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पिक कर्ज तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना भारतीय रिझर्व बँकेने तर फेडीसाठी तीन महिन्याची मुदत दिली असल्याने बँकेने 31मार्च 2020अखेर वसूल पात्र असलेल्या सर्व कर्जाची परतफेड येत्या 30 जून पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली.

नगर जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वाटप केलेल्या कर्जाचा वसूल पात्र कर्जाचा भरणा दिनांक 31 मार्च 2020 रोजी करण्यासाठी काही शाखांमध्ये कर्जदारांनी गर्दी केलेली होती. सध्याच्या कोरोना संसर्गजन्य रोगामुळे शासनाने सर्वत्र 144 कलम लागू केल्याने व कर्जफेडीस मुदती वाढीचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आदेश नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व शासनाच्या 144 कलमाचे आदेशाने शाखांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून बँकेने दिनांक 27 मार्च ज्यांना वसुली द्यायची आहे त्यांचे सोईकरता दिनांक 28 व 29 मार्च रोजी शाखा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. तथापि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे आदेश दिनांक 27 मार्च रोजी बँकेस उशिरा प्राप्त झाल्याने बँकेने आज तत्काळ दिनांक 28 मार्च रोजी सुधारित परिपत्रकाद्वारे सर्व शाखांना व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना सुचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

बँकेच्या नियोजित धोरणानुसार या परतफेडीची मुदत दरवर्षी 31 मार्च असते, या निर्णयाचा नगर जिल्ह्यातील बँकेच्या संलग्न प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायट्या शेतकरी कर्जदार सभासदांना फायदा होणार आहे. जिल्हा बँकेने खरीप पिकासाठी सुमारे 711 कोटीचे तर रब्बी पिकांसाठी सुमारे 82 कोटी चे कर्जवाटप केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या