
सामना प्रतिनिधी । लातूर
साडेचार वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील देवणी तालुका व ग्रामीण भागात आज पावसाने हजेरी लावली. देवणी तालुक्यातील बोरोळ गावच्या शिवारात मेंढ्या चारत असताना वीज पडून 65 वर्षीय शेतकरी बाजीराव नागप्पा म्हेत्रे यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले पत्नी असा परिवार आहे.
साडेचार वाजण्याच्या सुमारास देवणी तालुक्यातील बोरोळ शिवारात मेंढ्या चारत असताना बाजीराव म्हेत्रे त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

























































