शेतकरी खासदार ट्रक्टर घेऊन संसदेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या पहिल्या दिवशी शेतकरी नेते आणि माकप खासदार अमरा राम यांनी आज थेट ट्रक्टरमधून संसदेवर धडक मारली. सीकरच्या या खासदाराला संसदेच्या गेटजवळ पोलिसांनी थांबवले. त्यांनी शेतकऱयांना दिल्लीत येऊ दिले नाही. 13 महिने शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसले होते, त्यांच्या ट्रक्टरला शहरात परवानगी नव्हती; पण आज एक शेतकरी आणि त्याचा ट्रक्टर दोघेही संसदेत पोहोचले, असे खासदार अमर राम यांनी पीटीआयला सांगितले. अमर राम हे चार वेळा आमदार झाले असून अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष आहेत.