
सामना प्रतिनिधी, परतूर
पिकविमा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मिळावा यासाठी शिवसेनेने राज्यस्तरावर केलेल्या मागणीला विमा कंपन्यांनी अखेर मान्यता देत भरघोस विमा मंजूर केल्याने परतूर शिवसेनेच्या वतीने मोंढा भागात फटाके फोडून आनंद व्यक्त केला गेला.
विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अत्यत्प पिकविमा मंजूर करत शेतकऱ्यांची थट्टा केली होती. यासाठी विमा कंपन्यांच्या विरोधात राज्य शिवसेनेने सर्वत्र जोरदार आंदोलन करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांना पिकविमा मिळवून देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून विमा कंपन्यांनी यासाठी घसघसीत राशी मंजूर केली. जालना जिल्ह्याला सुमारे 22 कोटी विमा राशी मंजूर झाल्याने शिवसेनेने याचे जल्लोषात स्वागत केले आहे.
परतूर शहराच्या मोंढा भागात महादेव चौकात शिवसैनिकांनी फटाके वाजवून याचे जोरदार स्वाग्त केले. परतूरमध्येही विमा मदत केंद्र स्थापन करुन शेतकऱ्यांना सहकार्य केले गेले. या माध्यमातून विमा कंपन्यांनी शिवसेनेच्या मागणीला सहकार्य केल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विमा मिळणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख माधवरा कदम व तालूका प्रमुख अशोक आघाव यांनी आनंदोत्सव साजरा करतांना म्हटले. या वेळी भारत पंडीत, माऊली तनपूरे, अमोल काटे, लक्ष्मीकांत कवडी, बाबूराव बोरकर, तुकाराम बोरकर, बंडू थोरात, नारायण खालापूरे, किशोर पवार, आसाराम देवकर यांसह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.

























































