जीन्स girl

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गायत्री दातार

 फॅशन म्हणजे…आपला स्वभाव, आपली वागणूक आपल्या कपडय़ातून व्यक्त करणे.

आवडती फॅशन…मला सुटसुटीत आणि सैलसर कपडे घालायला आवडतात. कपडय़ांची निवड करताना मी आरामदायक असण्याला प्राधान्य देते.

व्यक्तिगत आयुष्यात कशा प्रकारचे कपडे घालण्यास प्राधान्य देतेस?…जीन्स शर्ट किंवा जीन्स कुर्ती.

फॅशन म्हणजे केवळ कपडे की?…फॅशन म्हणजे कपडे. ते घालून तुम्ही कसे वावरता ते महत्त्वाचे. कारण कपडय़ांचे तेज चेहऱयावर दिसते. एकंदरीत तुमचं व्यक्तिमत्व.

आवडती हेअरस्टाईल?…केस सरळ करुन मोकळे सोडणे.

फॅशन जुनी की नवी?…जे मला शोभून दिसते ते. त्यात नवीन जुने असे काही नाही.

आवडता रंग?…लाल आणि काळा

तुझ्या जवळच्या माणसांना तुझी कोणती फॅशन आवडते…पारंपारिक पोशाखात माझ्या जवळच्यांना मी जास्त आवडते.

स्ट्रीट शॉपिंग आवडते का?…हो खूप. पुण्यात असताना फर्ग्युसन रोडला, कॅम्पमध्ये, एमजी रोडला स्ट्रीट शॉपिंग करायचे. बहुतांश मी दागिनेच खरेदी करायचे. कारण तेथे वैविध्य पाहायला मिळते आणि स्वस्तही असतात.

कोणत्या गोष्टीवर जास्त खर्च करतेस?…जीन्सवर.

काय आवडते?…इअरिंग्स. विशेष करुन झुमके.

आवडता ब्रॅण्ड…खूप आहेत. डब्ल्यूचे कुर्ते.

फॅशन फॉलो कशी करतेस?…आपण जे आजुबाजुला बघत असतो त्यातले आपल्याला काय चांगले वाटते. दुसऱयाला छान दिसते म्हणून मला वाटेल असे नाही तर मला काय छान दिसते आणि मला त्यात किती आरामदायक वाटतं हे मी आधी पाहते.

फॅशनबाबत अपडेट राहण्यासाठी?…शॉपिंगला गेल्यावर नवीन ट्रेण्ड कळतो.

ब्युटी सिक्रेट…गुपित असे काही नाही. मी माझी त्वचा मॉईश्चराईज ठेवते.

टॅटू काढायला आवडेल का?…काढायचा आहे. एखाद्याला एखादी गोष्ट आयुष्यभर लक्षात राहावी. ती आयुष्यभर अंगावर राहणार आहे, पुसता येणार नाही तरच टॅटू काढावा. ते सगळ्यात चांगलं माध्यम आहे की आपल्यासाठी कोण महत्त्वाचे आणि जवळचे आहे.

तुझ्या बॅगेत हमखास आढळणाऱया तीन गोष्टी..परफ्युम, मॉईश्चरायझर, लिपबाम.

फिटनेससाठी…जंकफूड शक्यतो टाळा. घरचे जेवण घ्या.