
फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल तब्बल 52 वर्षांनंतर फिफा वर्ल्ड कपच्या संघर्षभूमीत पुनरागमन करणाऱ्या कोंगोशी भिडणार आहे. आधुनिक वर्ल्ड कपमधील कोंगाचा हा पहिलाच सामना असून संपूर्ण जगाचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.
पात्रता फेरीत कॅमेरूनसारख्या बलाढय़ संघांना नमवत आणि प्ले-ऑफमध्ये जमैकावर 1-0 अशी मात करत कोंगोने विश्वचषकाचे तिकीट मिळवले आहे. अलीकडच्या सराव सामन्यात त्यांनी डेन्मार्कला 0-0 वर रोखून आपल्या भक्कम बचावाची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे पोर्तुगालसमोर ते आपला सर्वोत्तम आफ्रिकन खेळ दाखवतील, असा विश्वास आहे.
जेतेपदाचा दावेदार असलेल्या पोर्तुगालचे मुख्य बलस्थान त्यांची जागतिक दर्जाची मिडफिल्ड आणि 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. रोनाल्डोचा हा सलग सहावा वर्ल्ड कप असून त्याचे जगज्जेतेपदाचे स्वप्न अजूनही अधुरेच आहे. त्यामुळे ब्रुनो फर्नांडिस आणि बर्नार्डो सिल्वा यांची कल्पक साथीमुळे ते नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहेत.

























































