
मालवण धुरीवाडा येथील काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या रामेश्वर ऑटो गॅरेजला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी आणि एक कार जळून खाक झाली.
स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करून तसेच नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र भडकलेली आग विझेपर्यत बहुतांश सर्व गाड्या जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. आग शॉर्ट सर्किटने लागल्याचे बोलले जात होते. मात्र नेमके कारण समजू शकले नाही.नगरपालिकेचा अग्नीशमन बंब दुरुस्तीसाठी असल्याने तो उपलब्ध न झाल्याने नगरपालिकेच्या बुलेट फायरफायटर द्वारे तसेच नागरिक यांच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु राहिले. नागरिकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले.



























































