चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या आवारात लागली आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आवारात आग लागल्याची घटना घडली आहे. आवारात ठेवलेल्या जप्तीच्या बसेस व इतर वाहनांना ही आग लागली आहे. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत अग्निशमन पथकाला पाचारण केले. अग्निशमन पथकाने वेळेत धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमुळे नक्की जप्त मालाचे किती नुकसान झाले याविषयी कळलेले नाही.