ऐन दिवाळीत फटाक्यांवर बंदी घातल्याने हजारो कोटींचे नुकसान, छोट्या दुकानदारांना मोठा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

दिल्लीसह अनेक राज्यांनी ऐन दिवाळीत फटाक्यांवर बंदी आणली. त्यामुळे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच फटाके विक्रीवरील बंदीमुळे छोट्या दुकानदारांचे मोठे नुकसान झाले आहे.

कन्फ़ेडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार फटाके खरेदी  विक्री करणार्‍या व्यावसायिकांना 10 हजार कोटींचा फटका बसला आहे. एकट्या दिल्ली राज्यात 5 ते 8 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

यंदा चीनचे फार सामान देशात आले नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकल फॉर व्होकलचा नारा दिला होता. व्यापार्‍यांनी या आवाहनाला प्रतिसाद देत चीनच्या सामानावर बहिष्कार घातला होता.

फटाके विक्री करणार्‍यांना जरी यंदा फटका बसला असला तरी दिवे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने चांदी, घड्याळ, बुट, फर्नीचर, कपडे, घरातील सामान, मिठाई या वस्तून मोठ्या प्रमाणात विकले गेल्याची माहिती कन्फ़ेडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्स ने दिली आहे.

यंदा दिवाळीत 72 हजार कोटींचा व्यवसाय झाला आहे. तर गेल्या दिवाळीत 65 हजार कोटींचा व्यवसाय झाला होता. यंदा व्यापार्‍यांनी चीनी वस्तूंचा बहिष्का केल्याने चीनला 40 हजार कोटींचा फटका बसला आहे.