जम्मू कश्मीरमध्ये एका मोठ्या कमांडरसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील पॉमबे आणि गोपालपोरा गावात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तीन दहशतवादी पॉम्बे मध्ये तर गोपलपोरामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.

मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये द रेझिस्टंट फ्रंटचा कमांडर अफाक सिकंदर याचा समावेश आहे. या कमांडरचा खात्मा झाल्याने दहशतवाद्यांना मोठा धक्का बसला आहे.

सोमवारी श्रीनगरमधील हैदरपोरा भागात देखील जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता.