उरुग्वेने इजिप्तला हरवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, एकतेरीनबर्ग

जोस मारिया जिमेनेजने ८९ व्या मिनिटात हेडरवर केलेल्या दमदार गोलच्या जोरावर माजी वर्ल्ड चॅम्पियन उरुग्वेने शुक्रवारी फिफा वर्ल्ड कपमधील ‘अ’ गटाच्या लढतीत इजिप्तला १-० अशा फरकाने हरवले. वर्ल्ड कपमधल्या सलामीच्या लढतीत विजय मिळवण्याची उरुग्वेची ही १९७० सालानंतरची पहिलीच खेप ठरली हे विशेष.

इजिप्त व उरुग्वे यांच्यामधील लढतीतील पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी झाली. उत्तरार्धही गोलशून्य बरोबरीत राहणार असे वाटत असतानाच जोस मारिया जिमेनेज याने अफलातून गोल करीत उरुग्वेला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. इजिप्तच्या मोहम्मद एलशेनवी याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

मोहम्मद सलाहला विश्रांती

इजिप्तचा महत्त्वाचा खेळाडू मोहम्मद सलाह या सामन्यामध्ये खेळला नाही. दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली. दरम्यान, उरुग्वेचा संघ या लढतीत ४-४-२ या फॉरमेशनने मैदानात उतरला, तर ४-२-३-१ या फॉरमेशनने इजिप्तच्या संघाने मैदानात आपला खेळ दाखवला.

fifa-3