
दादर येथील मुंबई महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावात शेजारील प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू घुसले यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन विभागाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता जलतरण तलावात प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू घुसले हे स्पष्ट होत नाही. तसेच जलतरण तलाव प्रशासन प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू आले याबाबत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करत नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू आले असा आरोप करणे योग्य नाही, असे वन विभागातील अधिकाऱयाने सांगितले.
दादर येथील मुंबई महापालिकेच्या महात्मा गांधी जलतरण तलावाशेजारी असलेल्या मरीन एक्वा प्राणिसंग्रहालय आहे. प्राणिसंग्रहालयातून मगरीचे पिल्लू आले, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता, मात्र मरीन एक्वा प्राणिसंग्रहालयाने हा आरोप फेटाळला असून प्राणिसंग्रहालयात देशीविदेशी पशुपक्षी ठेवण्याचा परवाना आहे, मात्र वन्य प्राणी ठेवण्याची परवानगी नसून मगर नसल्याचे प्राणिसंग्रहालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तसे काही दिसत नसल्याने प्राणिसंग्रहालयाविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे वन विभागातील अधिकाऱयाने सांगितले.
























































