गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अहमदाबाद येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थित वाघेला यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शंकरसिंह वाघेला यांनी 1996-97 या काळात गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. परंतु 2017 मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला रामराम केला होता. यानंतर त्यांनी जन विकल्प मोर्चा नावाचा पक्ष बनवत निवडणुकीसाठी 125 उमेदवार मैदानात उतरले होते, परंतु सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली होती.