
लग्न करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका एनआरआयच्या पाचव्या लग्नाचा डाव त्याच्या चौथ्या बायकोनेच उधळल्याचं वृत्त आहे. ही घटना हरयाणातील रोहतक येथे घडली आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या तरुणाचं नाव नरेश कुमार असं आहे. नरेश अमेरिकेत राहतो. त्याच्या विरुद्ध स्वीटी नावाच्या महिलेने पोलिसात तक्रार केली. नरेशशी तिचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. लग्नाच्या महिन्याभरात तो परत अमेरिकेत निघून गेला. त्याने जाताना तिचे दागिने घेऊन गेला. पाचवं लग्न करण्याच्या बेतात होता एनआरआय ‘लखोबा’, चौथ्या बायकोने केली भांडाफोड
दागिने घेऊन गेल्यानंतर त्याने तिथून अजून पैसे मागितले. जेव्हा पत्नीने पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने फोन उचलणं बंद केलं. त्यानंतर तिला थेट तो पाचवं लग्न करत असल्याची माहिती कळाली.
ही माहिती मिळताच स्वीटीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिच्या तक्रारीवरून नरेश कुमार याला अटक करण्यात आली. स्वीटीच्या म्हणण्यानुसार, तिला नरेश याची यापूर्वी तीन लग्न झाली असल्याची माहिती मिळाली आहे. आताही तो पाचवं लग्न करण्याच्या बेतात होता.
सध्या नरेश याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत असून आरोपात तथ्य आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

























































