स्कुटी विकण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनोळखी व्यक्तीने स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने 1 लाख 20 हजार 040 रुपयांची रक्कम गुगल पे व फोन पे या ऍप्सद्वारे पाठविण्यास सांगून फसवणूक करण्यात आली आहे. याबाबतची तक्रार सुमित गणपत जुवाटकर (33, रा देवगड) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दिली दिली आहे. ही घटना 10 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी 2023 रोजी घडली.

या फसवणुकीत 2000 रुपये कुरिअर, 18 हजार मूळ गाडीची किंमत, 15,120 इन्शुरन्स, 120 इन्शुरन्स चार्जेस, 30240 इन्शुरन्स ट्रांझेक्शन जास्त झाल्याने असे एकूण 1 लाख20 हजार 040 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान (सुधारणा)अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.